Lokmat News Update | उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा | शेतकऱ्यांनो सावध व्हा | Climate | Marathi

2021-09-13 0

२३ फेब्रुवारीदरम्यान उत्तर महाराष्ट्रात गारपीट होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, पिकं उघड्यावर सोडू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भात गारपिटीने थैमान घातलं होतं. जालना जिल्ह्याला या गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला होता. त्यानंतर आता पुन्हा उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.गेल्या आठवड्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११ जिल्ह्यातील सुमारे ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झालं होतं.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires